एलसीबीच्या कारवाईत लाखाचा गुटखा जप्त

दोघांविरूद्ध गुन्हा
एलसीबीच्या कारवाईत लाखाचा गुटखा जप्त
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी (Police) राहुरी खुर्द (Rahuri Khurd0 येथील पवन ट्रेडर्स दुकानामध्ये छापा (Shop Raid) टाकून एक लाख एक हजार 587 रूपये किंमतीचा गुटखा जप्त (Gutkha Seized) केला. याप्रकरणी दोघांविरूद्ध राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत देविसिंग गिरासे (वय 21), पृथ्वीराज उर्फ पवन दगडूसिंग गिरासे (रा. राहुरी खुर्द) अशी गुन्हा दाखल (Filed a Crime) झालेल्या गुटखा विक्रेत्यांची नावे आहेत. पोलीस अंमलदार रणजित जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

पृथ्वीराज गिरासे हा गुटखाची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katke) या ना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार दिनेश मोरे, लक्ष्मण खोकले, शंकर चौधरी, कमलेश पाथरूट, रणजित जाधव यांच्या पथकाने गिरासे याच्या दुकानावर छापा टाकला. यावेळी गुटख्यासह प्रशांत गिरासे मिळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करत दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com