गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत लाखो भाविकांनी घेतले साईदर्शन

गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत लाखो भाविकांनी घेतले साईदर्शन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. गुजरातसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.

काल बुधवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती झाली. काकड आरतीनंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. या मिरवणुकीत मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी पोथी, उपाध्यक्ष अ‍ॅड. जगदीश सावंत व विश्वस्त सचिन कोते यांनी प्रतिमा, विश्वस्त अविनाश दंडवते यांनी विणा घेऊन सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. सुहास आहेर, सचिन गुजर, जयंतराव जाधव, महेंद्र शेळके, डॉ. एकनाथ गोंदकर, डॉ. जालिंदर भोर, सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नाशिक संजय धिवरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी 6.20 वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. सकाळी 7 वाजता श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्त विश्वस्त महेंद्र शेळके व त्यांच्या पत्नी सुरेखा शेळके यांनी सहपरिवार श्रींची पाद्यपूजा केली. सकाळी 7.30 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व त्यांचे पती संजय धिवरे सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नासिक यांच्याहस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधिवत पूजन करून ध्वज बदलण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. जगदीश सावंत, विश्वस्त अ‍ॅड. सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, डॉ. एकनाथ गोंदकर, डॉ. जालिंदर भोर, सचिन कोते, मंदिरप्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते. गुजरातसह राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, अंधेरी, वसई, पालघर, अलिबाग, विरार, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, गेवराई, नांदेड आदी ठिकाणाहून आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.

उत्सवाच्या मुख्य दिवशी श्रींचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनाकरिता खुले असल्यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

आज उत्सवाच्या सांगता दिनी गुरुवार दिनांक 14 जुलै रोजी पहाटे 5.05 वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी 7 वाजता श्रींची पाद्यपूजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होणार असून सकाळी 10 वा. स्नेहल संतोष पित्रे, डोंबवली (ठाणे) यांचा गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com