अज्ञानारुपी अंधकारावर ज्ञानाचा प्रकाश टाकतात, त्यांना गुरु म्हणतात

महंत रामगिरी महाराज : घरीच गुरुपूजन, गुरुवंदना करावी

अस्तगाव (वार्ताहर)- गुरु हा जीवनात कामधेनू गायी प्रमाणे असतो, सुखापर्यंत नेणारा गुरु असतो. अज्ञानारुपी अंधकारावर ज्ञानाचा प्रकाश टाकतात, त्यांना गुरु म्हणतात, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

आज रविवारी गुरुपौर्णिमा असल्याने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सार्वमतशी बोलत असताना, भाविकांना त्यांनी संदेश दिला. गुरुपौर्णिमा हा उत्सव सराला बेटावर चांगल्या प्रकारे साजरा होतो. परंतु या वर्षी करोना मुळे सराला बेटावर भाविकांनी येवु नये, घरीच गुरुपूजन, गुरुवंदना करावी असा संदेश त्यांनी दिला.

व्यास पोर्णिमा, आषाढ शुध्द पौर्णिमा यालाच गुरुपौर्णिमा म्हणतात. महर्षी व्यासांचा जन्म या दिवशी झालेला आहे. नमस्तुते व्यास विशाल बुध्दे, ज्याची विशाल बुध्दी आहे. संपुर्ण विश्‍वात जेवढे ज्ञान आहे. येणे कारणे म्हणते पाहे व्यास उचिष्ठ जगत्रय। माउली ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात, या जगात जेवढे ज्ञान आहे, ते सर्व व्यासांचे उचिष्ट आहे. अशा प्रकारे व्यासांचा जन्म दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा होय.

या दिवशी गुरुवंदना, गुरुंचा अशिर्वाद घ्यावा, गुरुंचे दर्शन घ्यावे, आणि गुरुंना गुरुदक्षिणा द्यायची असते. अशा प्रकारे गुरुपौर्णिमेचा महोत्सव सर्व दूर साजरा होतो. अज्ञानारुपी अंधकारावर ज्ञानाचा प्रकाश टाकतात त्यांना गुरु म्हणतात. गुरु हा जीवनात कामधेनु गायी प्रमाणे आहे, साधकांना सिध्द अवस्थे पर्यंत नेणारा असतो. सुखा पर्यंत नेणारा गुरु असतो. गुरुची सेवा आपल्या अंतकरणात असावी, सदगुरुंची मुर्ती ही चालते बोलते परब्रम्ह आहे. अशा प्रकारे गुरुपौर्णिमेला गुरुंची पुजा केली जाते.

यावर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सहा करोना महामारित अडकला आहे. गुरुपौर्णिमा सराला बेटावर मोठ्या उत्सहात साजरी होत असते. परंतु यावर्षी कुणीही करोना माहिमारीच्या संकटामुळे सराला बेटावर न येता, आपल्या गुरुंची वंदना करावी, पुजन घरीच करावे, घरीच राहावे, ध्यान करावे, पुजन करावे, येथे आले तर अडचण येवु शकते. करोना मुळे सर्वांनी सहकार्य करावे.

Related Stories

No stories found.