‘ते’ सात संचालकही स्वत:चे खिसे भरतात का?

गुरूमाऊलीच्या मुळे यांचा राहाणे यांना सवाल
‘ते’ सात संचालकही स्वत:चे खिसे भरतात का?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षक बँकेचे (Teacher Bank) संचालक प्रवास भत्ता ( Director Travel Allowance) घेऊन जर स्वतःचे खिसे भरत असतील तर यापूर्वी बँकेचे चेअरमन असलेले रावसाहेब रोहोकले (Ravsaheb Rohokale) यांनी प्रवास भत्ता घेतला नव्हता का आणि सध्या तुमच्या गटाचे सात संचालक देखील प्रवास भत्ता घेतात मग ते सुद्धा आपले खिसे भरतात का ? असा संतप्त सवाल गुरूमाऊली मंडळाच्या (Gurumauli Mandal) महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली मुळे (Anjali Mule) यांनी केला आहे.

शिक्षक बँकेची वार्षिक सभा (Annual meeting of Shikshak Bank) रविवारी होणार असून सभेपूर्वी नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. रोहोकले गटाच्या गुरूमाऊली मंडळाचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आर. पी. राहाणे (R.P.Rahane) यांनी काल संचालक मंडळाच्या प्रवास भत्त्यावरून सत्ताधारी मंडळावर अनेक आरोप केले होते. त्याला उत्तर देताना मुळे या बोलत होत्या. प्रवासभत्ता हा संचालक मंडळाच्या मासिक सभा तसेच प्रत्येक शाखेत होणार्‍या दर आठवड्याच्या लोन कमिटीच्या सभा व इतर प्रवास याबद्दल दिला जातो.

14 तालुके व मुख्यालय यात वेळोवेळी झालेल्या सभा पाहता वर्षभराचा हा खर्च आहे. अपवादात्मक दोन तीन सभा सोडल्या तर इतर सर्व सभा या ऑफलाईन झालेल्या आहेत. प्रवास भत्ता हा विषय घेऊन सभासदांची दिशाभूल कोणी करू शकत नाही. विद्यमान संचालक मंडळात आपल्या गटाचे सात संचालक देखील आहेत हे राहाणे यांनी विसरू नये, असा सल्लाही मुळे यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com