जो बोले सो निहाल, सत श्री अकाल...

गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त जयघोष । शहरात प्रभात फेरी
जो बोले सो निहाल, सत श्री अकाल...

अहमदनगर (प्रतिनिधी)

बोले सो निहाल, सत श्री अकाल... चा जयघोष, अखंडपाठ, किर्तन व प्रवचनांच्या भक्तीमय वातावरणात शहरातील विविध गुरुद्वारा येथे गुरुनानक देवजी यांची ५५२वी जयंती म्हणजेच गुरुपुरब आज (शुक्रवारी) उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी तारकपूर येथील भाईकुंदनलालजी गुरुद्वारा, अहमदनगर शीख, पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने पारंपारिक वाद्यासह प्रभातफेरी काढण्यात आली होती. यामध्ये समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत गुरुनानक देवजी यांचा जयघोष केला.

या प्रभातफेरीचे टॉपअप पेट्रोल पम्प येथे जनक आहुजा परिवाराच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. फेरीमध्ये वाहनावर असलेल्या गुरुग्रंथ साहिबावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर गुरुनानक देवजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जनक आहुजा, इंद्रजीत नय्यर, अभिमन्यू नय्यर, हरजितसिंह वधवा, राजीव बिंद्रा, प्रीतपालसिंह धुप्पड, जतीन आहुजा, अनिश आहुजा, राजेंद्र कंत्रोड, ब्रिजमोहन कंत्रोड, राजा नारंग, राहुल बजाज, कैलाश नवलानी, जालिंदर बोरुडे, प्रशांत मुनोत, किशोर मुनोत, अमोल गाडे, बलजीत बिलरा, मनोज मदान, अर्जुन मदान, सरबजीतसिंह अरोरा, बबलू आहुजा, जोगिंदरसिंह धुप्पड, किशोर कंत्रोड, मनमोहन चोपडा आदींसह घर घर लंगर सेवा व जी.एन. डी. ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

गुरुनानक जयंतीनिमित्त मागील सात दिवसांपासून शहरातील गुरुद्वाऱ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कीर्तन-प्रवचन, अखंडपाठ, सांस्कृतिक कार्यक्रमासह लंगरचा भाविकांनी लाभ घेतला. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून गुरूनानक देवजी यांचे संदेश व विचार समाज बांधवांना सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com