
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
गुंजाळवाडी परिसरातील एका प्लॉटमधून काहीजण बेकायदेशीर मुरूम चोरी करत आहेत. ही मुरूम चोरी थांबवून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत संबंधित नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गुंजाळवाडी परिसरातील गट नं.4 मधील प्लॉट नंबर 44, 45, 46 मधील काही जागा निळवंडे- पाटबंधारे विभागाकडे वर्ग आहे. यातील काही जागा आमच्या ताब्यात आहे.
सदर जागेमध्ये अज्ञात व्यक्ती मुरुमाची चोरी करत आहे. यामुळे या जागेत मोठे मोठे खड्डे तयार झाले आहेत. या जागेतून होणारी मुरूम चोरी थांबवावी, अशी मागणी या परिसरातील प्रदीप शंकर पोळ, निर्मला प्रमोद जोशी, नारायण भगवंत कुलकर्णी आदींनी केली आहे.