<p><strong>नेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa</strong></p><p>सरकारी दप्तर दिरंगाईचा फटका बसणे ही बाब सर्वसामान्य जनतेसाठी नेहमीचीच झालेली आहे.</p>.<p>"सरकारी काम आणि 6 महिने थांब" या म्हणीचा प्रत्यय सौंदळा येथील कॉ. भारत आरगडे यांना नुकताच आला आहे. त्यांनी नवीन बंदूक शस्त्र परवाना मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 2010 मध्ये दाखल केला. अर्ज निकाली काढण्यासाठी तब्बल 11 वर्षे लागले आहेत.</p>