
आंबी |वार्ताहर| Ambi
गुहा - पिंपळगाव फुणगी शिवहद्दीत प्रवरा उजव्या कालव्यात एका 40 वर्ष वयाच्या अनोळखी महिलेचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यावर तरंग असल्याचे आढळून आले.
गुहा-पिंपळगाव शिव हद्दीतील प्रवरा उजवा कालव्यातून रोटेशन सुरु असून बुधवारी दुपारी एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्यानचे स्थानिक नागरिकांना आढळून आल्यानंतर येथील पोलीस पाटील व सरपंच यांना या मृतदेहाबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात सदर घटनेची माहिती कळवली.
त्यानुसार राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्यासह सहायक फौजदार एन. आर. शिंदे, पो. हे. काँ. लक्ष्मण बोडखे घटनास्थळी दाखल झाले. प्रवरा उजव्या कालव्यातील पाण्यावर तरंगत असलेला महिलेचा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.