राहुरी (प्रतिनिधी) -

राहुरी तालुक्यातील गुहा येथे दि. 4 जानेवारी रोजी किरकोळ कारणावरून ओहळ व भालेराव या दोन गटात कुर्हाड, लोखंडी पाईप व दांड्याने तुफान

हाणामारी झाली. या घटनेबाबत राहुरी पोलिसात ओहळ व भालेराव या दोन्ही गटातील एकूण 16 जणांवर परस्पर विरोधात जबर मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सिद्धार्थ राजेंद्र ओहळ, वय 30 वर्षे, राहणार जुना सात्रळ रोड, गुहा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, यातील फिर्यादीचा भाऊ निखिल हा गुहा गावात दूध घालण्यासाठी जात असताना रस्त्यामध्ये फिर्यादीचा भाऊ थांबलेला होता. यावेळी रवींद्र भालेराव हा तेथे आला व म्हणाला, तू माझ्याकडे का पाहतो?. तेव्हा फिर्यादीचा भाऊ निखिल त्यास म्हणाला, मी तुझ्याकडे पाहिले नाही. तेव्हा त्याने शिवीगाळ करून तुला पाहून घेईल, अशी धमकी देऊन तो निघून गेला. फिर्यादीचा भाऊ हा परत घराकडे येत असताना आरोपी बाळासाहेब दगडू भालेराव, सतीश दगडू भालेराव, दगडू लक्ष्मण भालेराव, सुरेश भागवत ओहळ, राहुल सुरेश भालेराव, रवींद्र दगडू भालेराव, अशोक सुरेश ओहळ सर्व राहणार गुहा, ता. राहुरी. हे येथे आले व पूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये आमचे पाहुण्यांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी मी व माझा भाऊ आम्ही दोघांनी त्यांचा वाद मिटविला होता. याचा राग मनात धरून शिवीगाळ करून गैरकायद्याची मंडळी एकत्र जमून फिर्यादी हे त्यांना समजावून सांगत होते. यावेळी सिद्धार्थ ओहळ यांच्या हाताला चावा घेतला. कुर्हाडीने त्यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तेव्हा फिर्यादीचा भाऊ निखिल व साक्षीदार हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना कुदळीच्या दांडक्याने मारून जखमी केले आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच बाळासाहेब दगडू भालेराव वय 35 वर्षे, राहणार जुना सात्रळ रोड, गुहा. यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, यातील फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ असे शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते.

पूर्वी शेताचे सामायिक बांधावरून झालेल्या वादावरून आरोपी अशोक गणपत ओहळ, नंदा अशोक ओहळ, राजेंद्र गणपत ओहळ, सुनीता रमेश ओहळ, सुनीता राजेंद्र ओहळ, निखिल राजेंद्र, अक्षय राजेंद्र ओहळ, प्रवीण अशोक ओहळ, विकास रमेश ओहळ सर्व राहणार गुहा यांनी गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून फिर्यादीस लोखंडी पाईप, कुर्हाडीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले आहे. काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादीचा भाऊ हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यांनाही लोखंडी पाईप, कुर्हाडीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

दोन्ही गटाच्या परस्पर फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.