
लोकमान्य ग्रामविकास मंडळ
गुहा |वार्ताहर| Guha
राहुरी तालुक्यातील गुहा सोसायटीच्या निवडणुकीतील लोकमान्य ग्रामविकास मंडळाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ वाढविण्याचा कार्यक्रम गुहा गावातील ग्रामदैवत हनुमान मंदिरात मंडळाचे अध्यक्ष माजी चेअरमन रामचंद्र बळवंत कोळसे यांच्या हस्ते व ज्येष्ठ सभासद चंद्रभान नाना उर्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
मंडळाचे सदस्य अॅड. भगवान उर्हे यांनी प्रास्ताविक केले. बडोदा बँकेचे माजी शाखाधिकारी राजेंद्र माधव कोळसे यांनी उमेदवारांचा परिचय करुन दिला. यावेळी माजी सरपंच साईनाथ पा. कोळसे , मेजर चंद्रकांत सौदागर, राहुरी विद्यापिठामधील डॉ. संजय विश्वनाथ कोळसे, विनायक ओहोळ यांनी मनोगत व्यक्त केले.
गुहा सोसायटीचा कारभार व्यवस्थित करुन सभासदांना नफा देण्याचा प्रयत्न करु, असे सांगून चंद्रकांत सौदागर यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
जनसेवा परिवर्तन मंडळ
गुहा |वार्ताहर| Guha
राहुरी तालुक्यातील गुहा येथील गुहा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीतील जनसेवा परिवर्तन मंडळाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ गुहा गावातील ग्रामदैवत हनुमान मंदिरात मंडळाचे सदस्य भाऊसाहेब माणिक कोळसे तसेच माजी चेअरमन बबनराव भाऊ उर्हे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
ग्रामपंचायत सदस्य डॉ. विजय वाबळे यांनी प्रास्ताविक केले तर ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय अंकुश शिंदे यांनी उमेदवारांचा परिचय करुन दिला. माजी चेअरमन बबनराव उर्हे, प्रेरणा पतसंस्थेचे आधारस्तंभ सुरेश वाबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सभापती मनिषा अविनाश ओहोळ, ग्रामपंचायत सदस्य शौकतभाई सय्यद, सरपंच उषाबाई चंद्रे, माजी सरपंच रामनाथ उर्हे, गजानन नाना उर्हे, सुकदेव दगडू कोळसे, भाऊसाहेब सौदागर यांच्यासह सभासद उपस्थित होते. भाऊसाहेब कोळसे यांनी आभार मानले.