रांगेत उभे राहुन टोकन मिळवा आणि गर्दी टाळून लस मिळवा

रांगेत उभे राहुन टोकन मिळवा आणि गर्दी टाळून लस मिळवा

गुहा |वार्ताहर| Guha

करोना आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यात ग्रामीण भागात जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यापासून आपला व आपल्या कुटुंबातील सदस्यांचा बचाव व्हावा याकरिता नागरिक लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहे. यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गुहा यांनी अनोखा उपक्रम सुरु केला आहे. येथे रुग्णांना टोकन देवून वेळ सांगण्यात येते यामुळे गर्दीवर नियंत्रण येऊ शकते.

प्राथमिक केंद्राची मेडिकल ऑफिसर डॉ. गणेश आडभाई यांनी सुरुवातीला मार्च महिन्यात पहिला डोस घेतला. अशा नागरिकांनी दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. तरी ज्यांचा दुसरा डोस राहिला असेल त्यांनी तो घेण्याचा आग्रह करावा व त्यांना तो प्रथम देण्याचा आमचा तो मानस आहे. तरी दुसरा डोस घेणारांनी रांगेत उभे राहून टोकन देण्यात येईल, जेवढी लस तेवढेच टोकन आणि राहील त्यांनी परत लस आल्यानंतर याच पद्धतीने रांगेत उभे राहून टोकन घेणे म्हणजे गर्दी होणार नाही. इतर लाभार्थी तेथे न थांबता घरी जातील.

प्रथम डोस घेतलेले नागरिक दुसर्‍या डोसच्या प्रतिक्षेत असतांनाच 18 ते 45 वयोगटातील लसीकरण त्यामुळे लसीकरणांवर गर्दी वाढण्याचे प्रमाण जास्त होईल. तरी अजून जुने लाभार्थीच लसीच्या प्रतिक्षेत असतांना 18 ते 45 वयोगटात लस घेण्याकरिता लसीकरण केंद्रात मोठ्या संख्येने गर्दी होणार त्यामुळे 60 वयाच्या पुढील लस आणि 18 ते 45 वयोगटातील लस भरपूर वाढवून दिली तर आणि टोन पद्धतीने लस देण्याचा आमच्या मानस आहे.

समजा 150 लस मिळालीतर 150 लोकांना टोकन देवून झटपट लस देता येईल टोकन पद्धतीने दररोज सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही मोहीम पूर्ण होेईल. तरी नागरिकांनी लसीकरणाला गोंधळ न घालता टोकन पद्धतीने स्विकार करुन गर्दी टाळावी. तरच गर्दीवर नेहमीच नियंत्रण येवू शकते असे डॉ. गणेश आडभाई यांनी सुचित केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com