गुहा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार

अपघात | Accident
अपघात | Accident

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) गुहा बसस्थानकाजवळ (Guha Bus Stop) नगर- मनमाड हायवेवर (Nagar-Manmad Highway) आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका अंडे वाहतूक करणार्‍या पिकअपने एका शेतमजूर महिलेस जोराची धडक दिली (The Pickup Hit a Woman farm Laborer). यात ती जागीच ठार (Death) झाली. सध्या नगर-मनमाड हायवेचे (Nagar-Manmad Highway) काम सुरू असल्यामुळे गुहा (Guha) पासून एकेरी वाहतूक सुरू आहे.

गावातील वंदना विलास सौदागर ही महिला गुहा गावात आठवडे बाजार असल्यामुळे बाजारातून ज्वारी खरेदी करून रोड पास करत असताना अंडे वाहतूक करणारा पिकअपने भरधाव वेगात येऊन महिलेस रोड क्रॉस करत असताना जोराची धडक दिली. यात ही महिला जागीच गतप्राण झाली. पिकअप ओव्हर टेकिंग करत असताना हा अपघात झाला.

पिकअपने जोरात धडक देऊन पुढे निघून गेला असता दोन तीन वाहनांनाही धडक देऊन पसार झाला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन लगेच सदर महिलेला हॉस्पिटला दाखल केले असता तीला मयत घोषीत करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com