गुहात कोळसे कुटुंबांत हाणामारी

चौघे जखमी, परस्पर विरोधी फिर्यादी 13 जणांविरुध्द गुन्हा
गुहात कोळसे कुटुंबांत हाणामारी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

आमच्या दारातून जायचे नाही. असे म्हणत आठ जणांनी चार जणांना शिवीगाळ करून मारहाण करून जखमी केले. तर दुसर्‍या घटनेत गैरकायद्याची मंडळी जमवून तिघा जणांना शिवीगाळ करत लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात तिघे जखमी झाले राहुरी तालुक्यातील गुहा येथील कोळसे कुटुंबांत ही हाणामारी झाली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार दोन्ही गटाच्या 13 ज़णांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पहिली फिर्याद विशाल बाळासाहेब कोळसे, वय 28 वर्षे, राहणार गुहा, या तरुणाने दिली असून त्यात म्हटले आहे की, दि. 5 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजे दरम्यान विशाल कोळसे हा त्याचे दुकान बंद करून घरी गेला असता त्याच्या घरासमोर आरोपी हे त्याच्या वडिलांना शिवीगाळ करत होते. तेव्हा विशाल कोळसे याने आरोपींना विचारले, तुम्ही शिवीगाळ का करता? तेव्हा आरोपी म्हणाले आमच्या दारातून जायचे नाही. यावेळी विशाल कोळसे त्यांना म्हणाला, हा सर्वांचा रस्ता आहे. आम्ही येथून ये जा करणारच, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी विशाल याचे वडिल, आई व बहीण भांडण सोडविण्यासाठी आले. तेव्हा आरोपींनी त्यांना वाईट शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेत विशाल कोळसे हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर राहुरी फॅक्टरी येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

विशाल बाळासाहेब कोळसे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजय गंगाधर कोळसे, प्रसाद अजय कोळसे, संजय गंगाधर कोळसे, आकाश संजय कोळसे, गौरव राजेंद्र कोळसे, निता राजेंद्र कोळसे, संगीता अजय कोळसे, छाया संजय कोळसे, सर्व राहणार गुहा, ता. राहुरी. या आठ जणांवर गुन्हा रजि. नं. 848/2022 भादंवि कलम 323, 504, 143, 147, 148 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरी फिर्याद छाया संजय कोळसे, वय 45 वर्षे, राहणार वाबळे वस्ती, गुहा, या महिलेने दिली असून त्यात म्हटले आहे की, दि. 5 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास छाया कोळसे यांच्या घरासमोर यातील आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून आरोपी बाळासाहेब कोळसे याने लाकडी काठीने फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच इतर आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत छाया संजय कोळसे, कमल गंगाधर कोळसे व राजेंद्र गंगाधर कोळसे हे तिघेजण जखमी झाले असून राहुरी फॅक्टरी येथील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

छाया कोळसे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाळासाहेब एकनाथ कोळसे, विशाल बाळासाहेब कोळसे, अनिता बाळासाहेब कोळसे, वैष्णवी बाळासाहेब कोळसे, कोमल विशाल कोळसे सर्व राहणार वाबळे वस्ती, गुहा, ता. राहुरी. या पाच जणांवर गुन्हा रजि. नं. 855/2022 भादंवि कलम 324, 323, 504, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानदेव गर्जे व पोलीस नाईक सुनील निकम करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com