गुहा येथे लागलेल्या आगीत इलेक्ट्रीक दुकान खाक

गुहा येथे लागलेल्या आगीत इलेक्ट्रीक दुकान  खाक

गुहा |वार्ताहर| Guha

राहुरी तालुक्यातील गुहा येथे भर चौकात बंद पडलेल्या इलेक्ट्रीक दुकानाला आग लागून इलेक्ट्रीक वस्तू खाक झाल्या. दुकानांच्या सभोवार केरकचरा साचून त्यास जाळण्याच्या प्रयत्नात दुकानात आजूबाजूच्या मोकळ्या जागेतून आग आत शिरल्यामुळे दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या.

देवळाली प्रवरा नगरोरिषदेच्या अग्निशामक गाडीने दुकानाला लागलेली आग शांत केली. जेसीबीने दुकान हलवून शटरची तोंड उघडे करून आतील आग शांत करण्यात आली. गुहा येथील श्रीमती अपेक्षा राजेंद्र कोळसे यांच्या मालकीचे हे दुकान आहे. परंतू जवळजवळ 6 ते 7 वर्षे दुकान बंद अवस्थेत होते. आगीत एक ते दिड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. विशेष शेजारी राहती घरे व दुकाने आहेत. परंतू सुदैवाने त्यांना कसलीही झळ पोहचली नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com