गुढीपाडवा यात्रेनिमित्त शिंगणापुरात दोन लाख भाविकांचे शनीदर्शन

गुढीपाडवा यात्रेनिमित्त शिंगणापुरात दोन लाख भाविकांचे शनीदर्शन

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) शनीशिंगणापूर (Shanishinganapur) येथे गुढीपाडवा (Gudipadawa) यात्रेनिमित्त सुमारे दोन लाख भाविकांनी (Devotees) भेट देवून शनिमुर्तीचे दर्शन घेतले. परीसरातील विविध गावातून आलेल्या कावडयात्रेच्या मिरवणुका (Procession) मोठ्या जल्लोषात व भावभक्तीत पार पडल्या.

गुढीपाडवा (Gudipadwa) यात्रा शनिवारी आल्याने शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजता कावडीच्या पाण्यासाठी शनिचौथरा खुला करण्यात आला होता. पहाटे साडेचार वाजता आरती सोहळा झाल्यानंतर गर्दीचा ओघ सुरु झाला. सकाळी सात नंतर गावात कावड मिरवणुकीचा जल्लोष सुरु झाला. ‘शनि भगवान की जय’, ‘पवनपुत्र हनुमान की जय’च्या घोषणा देत युवकांनी कावडीच्या पाण्याचा अभिषेक शनिमुर्तीला घातला.

कावडीचे पाणी झाल्यानंतर साडेअकरा वाजता त्रिंबक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, विश्वस्त मंडळ, कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले उपस्थित होते. मुख्य पुजारी अशोक कुलकर्णी यांनी शनिदेवाला साखरेचे ‘कडे’ अर्पण करुन ‘गाठी’चा हार घातला. हा सोहळा पाहण्यासाठी चौथरा परीसरात हजारो भाविक उपस्थित होते.

यात्रेनिमित्त मेवामिठाई, खेळणीची दुकाने लागली होती. देवस्थानच्या वतीने पिण्याचे पाणी, सावलीसाठी मंडप टाकण्यात आला होता.

करोनाचे निर्बंध उठल्याने व्यावसायिकांत आनंद

करोनाचे सर्व निर्बंध उठल्याने व्यावसायिकांत आनंदाचे वातावरण दिसले. संधीचा फायदा म्हणून अचानक लटकूंची संख्या वाढली होती. वाहने अडवून पुजासाहित्यासाठी सक्तीचे वाढते प्रकार झाले. रस्त्यावरच खाद्यपदार्थाच्या हातगाड्या व वस्तू विकणारे बसल्याने वाहतुकीची कोंडी अनेकदा झाली.पोलिसांनी दिवसभरात एकही कारवाई केली नाही.

Related Stories

No stories found.