खा.डॉ. विखे यांनी कोव्हीड सेंटरमध्ये  उभारली गुढी

खा.डॉ. विखे यांनी कोव्हीड सेंटरमध्ये उभारली गुढी

शिर्डी (प्रतिनिधी) -

ऐक्याची स्नेहाची आणि नववर्षांच्या स्वागताची गुढी उभारताना कोव्हीड संकट निवारण्याचा संकल्प करून खा. डॉ. सुजय विखे पाटील

यांनी कोव्हीड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांसमवेत गुढी उभारुन पाडवा सण गोड केला.

गुढीपाडव्याचे औचित्य साधून खा. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथील कोव्हीड रूग्णालयास भेट दिली. सर्व नियमांचे पालन करून त्यांनी कोव्हीड सेंटरमध्ये आरोग्याची गुढी उभारली. या संकटाला घालविण्यासाठी उपाय योजनांबरोबरच नियमांचे पालन आणि निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प यानिमित्ताने सर्व अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी केला.

शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, वैद्यकीय अधिकारी मैथिली पितांबरे, डॉ. गोकुळ घोगरे, डॉ. संजय गायकवाड, मंगेश त्रिभुवन, सुजित गोंदकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कोव्हीड रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेवून कोव्हीड सेंटरमध्ये अधिकच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आ. विखे पाटील यांनी अधिकार्‍यांशी चर्चा करून सूचना दिल्या होत्या. त्याचाच पाठपुरावा खा. विखे यांनी रुग्णालयास भेट देवून केला. बेडची व्यवस्था ऑक्सिजन सुविधा आणि आवश्यक असणारी उपचाराची साधन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने खा. विखे यांनी अधिकार्‍यांशी चर्चा करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com