पालकमंत्र्याच्या आदेशाला पारनेर तहसिल प्रशासनाकडून ठेंगा

अतिवृष्टी नुकसान होऊनही केवळ पंचनाम्याचा फार्स
पालकमंत्र्याच्या आदेशाला पारनेर तहसिल प्रशासनाकडून ठेंगा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिवृष्टी झालेल्या गावांमध्ये जाऊन पिकांची पाहणी करून पंचनामे करावे असा आदेश तालुक्यातील तहसील प्रशासनास दिले ओहत. मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशाला गोरेगावसह इतर गावात केवळ पंचनाम्याचा फार्स करून शासकीय अधिकार्‍यांनी ठेंगा दाखवला आहे.

तालुक्यातील गोरेगाव सह सुपा, वाळवणे, पिपरी गवळी, रांजणगाव मशिद, रायतळे, अस्तगाव, रूईछत्रपती, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, कडूस, पाडळी रांजणगाव,पळवे, जातेगाव,नारायणगव्हाण, वाडेगव्हाण, घाणेगाव, गटेवाडी, म्हसणे सुलतानपूर, हंगा, वाघुंडे, आपधूप, शहाजापूर सह तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक पिके वाया गेली असून शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी, ग्रामसेवक, यांनी वरील एकाही गावांमध्ये पंचनामा केला नाही यामुळे गोरेगावसह तालुक्यातील शेतकर्‍यांना कोणी वाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दिवाळीच्या सणांमध्ये शेतकरी चिंताग्रस्त असताना अधिकारी मात्र दुर्लक्ष करत आहेत. गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासकीय अधिकार्‍यांना पंचनामा करण्याची विनंती केली मात्र या विनंतीची अधिकार्‍यांनी दखल घेतलेली नाही. अनेक शेतकरी चिंताग्रस्त असून शेतीमध्ये सततच्या पडणार्‍या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गवताचे साम्राज्य झाले आहे. एकीकडे पीकही वाया गेले आहे. दुसरीकडे अधिकारी पंचनामाही करत नाही.

तर आत्ता एक दोन दिवसापूर्वी पावसाने उघडकीस दिल्यामुळे शेतकर्‍यांना आपले शेत मशागत करायचे आहे. परंतु पंचनामा न झाल्याने तेही करता येत नाही. अशा तिहेरी संकटामध्ये शेतकरी सापडला आहे. असे असताना अधिकारी मात्र पंचनामा करण्यासाठी डोळे झाक करत आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये पंचनामे झाली नाही तर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोरेगाव गावातील शेतकर्‍यांनी दिला आहे.

शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सात ते आठ दिवस झालेले असताना अधिकार्‍यांना अद्याप पर्यंत जाग आलेली नाही. अधिकार्‍यांसह तहसीलदारांचा तालुक्यामध्ये ढिसाळ कारभार चालू आहे. तालुक्यातील तहसील प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा.

- सुमनताई तांबे. सरपंच गोरेगाव, ता. पारनेर.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com