अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे उद्या गुरुवारी एक दिवसाच्या जिल्हा दौर्यावर येत आहेत.

या दौर्यात ते जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार असून त्यानंतर अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.

गुरूवार सकाळी 7 वाजता मोटारीने शासकीय निवासस्थान मुंबई येथून चाकण मार्गे शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील भालगाव, बोधेगाव गावातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी.

त्यानंतर दुपारी शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांच्या भेटी गाठीसाठी वेळ राखीव असून दुपारी 4 वाजता करोना स्थितीबाबत महापौर बाबासाहेब वाकळे, ना. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), जिल्हा पोलीस अधिक्षक, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, संबंधित अधिकारी वर्ग यांच्या समवेत समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेणार आहेत. त्याचठिकाणी दुपारी 4.45 वाजता जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांबाबत आढावा बैठक घेवून त्यानंतर पुण्याला जाणार आहेत.