अग्नितांडव : दोषींना सोडणार नाही, पालकमंत्री तातडीने नगरकडे रवाना

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर (प्रतिनिधी)-

पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीने कोल्हापूर येथून नगरकडे रवाना झाले आहेत. या घटनेतील दोषींवर कडक करवाई करण्यात येईल, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
VIDEO : जिल्हा रुग्णालयाच्या करोना ICU विभागाला भीषण आग

अहमदनगर जिल्हा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला असून 7 गंभीर आहेत. या घटनेमुळे नगर जिल्हा हादरला आहे. करोना काळात सर्व दक्षता पाळण्याच्य सूचना असताना ही आग कशी लागली, यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
नगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 'या' दहा जणांचा मृत्यू

दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खा.सुजय विखे पाटील, स्थानिक आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील दाखल झाले होते.

पूर्वनियोजित दौर्‍यानुसार पालकमंत्री हसन मुश्रीफ रविवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरला पोहचणार होते. मात्र आगीच्या घटनेचे वृत्त समजताच ते नगरकडे रवाना झाले आहेत.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
नगर जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेस जबाबदार कोण?
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
नगर अग्नीकांड : मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com