राज्यकर अधिकार्‍यावर लाच मागितल्याचा गुन्हा

जीएसटी नंबर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी मागितले चार हजार
राज्यकर अधिकार्‍यावर लाच मागितल्याचा गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रद्द झालेला जीएसटी नंबर पुन्हा कार्यान्वित करून देण्यासाठी व्यवसायिकाकडे पंचासमक्ष चार हजार रुपये लाचेची मागणी करणार्‍या वस्तू व सेवा कर विभागातील राज्यकर अधिकारी (वर्ग दोन) यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारिका जयवंत निकम (वय 39) असे त्यांचे नाव आहे.

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ही कारवाई केली. पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील व्यवसायिकाने जीएसटी नंबर रिटर्न फाईल न केल्यामुळे जुलै, 2022 मध्ये रद्द करण्यात आला होता. तो पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी त्या व्यावसायिकाने राज्यकर अधिकारी निकम यांच्याकडे अर्ज दिला होता. दरम्यान जीएसटी नंबर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी निकम यांनी त्या व्यावसायिकाकडे पाच हजार रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार त्याने लाचलुचपत विभागाकडे केली होती.

लाचलुचपत विभागाने 17 नोव्हेंबर 2022 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता निकम यांनी तक्रारदार यांचा जीएसटी नंबर पुन्हा कार्यान्वित करून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यावरून बुधवार, 21 डिसेंबर रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सारिका निकम विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार चौधरी, सचिन सुद्रुक, राधा खेमनर, संध्या म्हस्के, तागड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com