
भेंडा |वार्ताहर| Bhenda
येथील अभय किराणा दुकानाला (Abhay Grocery Store) शनिवार दि.२४ रोजी रात्री शॉर्ट सर्किटने (Electrical Shortcircuit) लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान भस्मसात झाले असून यामध्ये किराणा माल व फर्नीचरचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, भेंडा येथे गाड़ी यार्ड परिसरातील भेंडा-कुकाणा रस्त्यावर (Bhenda Kukana Road) अशोकलाल सूरजमल चुत्तर यांचे अभय किराणा दुकान आहे. शनिवार दि.२४ डिसेंबर रोजी रात्री नेहमी प्रमाणे किराणा दुकान बंद करून दुकाना मागे असलेल्या घरात झोपले होते.
रात्री साडे आकरा वाजता किराणा दुकानाला अचानक आग (Fire) लागली. आग लागल्याचे लक्षात येताच आजुबाजूच्या लोकांनी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक बंब (Fire Extinguisher) बोलावून आग (Fire) विझविली. मात्र तो पर्यंत दुकानातील दुकानासह किराणा माल व फर्नीचर (Groceries and Furniture) जळून गेले होते. यात सुमारे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे (Electrical Shortcircuit) आग लागल्याचे सांगण्यात आले. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) खबर देण्यात आली आहे.