भर लोकवस्तीत किराणा मालाची लाखोंची चोरी

भर लोकवस्तीत किराणा मालाची लाखोंची चोरी

चोरीचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेरात कैद || व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण

राहाता |वार्ताहर| Rahata

शहरातील भरवस्ती शनिमंदिर रोडलगत असलेले आर. के. इंटरप्राईजेस या दुकानाचा छताचा पत्रा कापून अज्ञात चोट्यांनी लाखो रुपये किमतीचा किराणा माल तसेच रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री घडल्याने व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरी करणार्‍या अज्ञात चोरट्याने विरोधात राहाता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात मोठ्या लोकवस्तीत शनी मंदिर परिसरात विरेश रुणवाल यांच्या होलसेल किराणा मालाच्या दुकानात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा छताचा पत्रा कापून आतमध्ये प्रवेश करून रोख रक्कम व चिल्लर तसेच 26 सोयाबीन व 15 सूर्यफूल तेलाचे 15 लिटरचे डबे व 17 बॉक्स 12 लिटरचे सोयाबीन तेल, 13 किलो काजू असा एकूण 1 लाख 85 हजाराचा किराणा माल व रोख रक्कम चोरून नेण्याची घटना घडली आहे.

चोरी करणार्‍या चोरट्यांचे छायाचित्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. शनिवारी दुकानचे मालक विरेश रुणवाले सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यात आले असता दुकानातील किराणा मालाची चोरी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. राहाता पोलिसात वीरेश रुणवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

राहाता शहरात दुकान तसेच घर फोडींचे प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने शहरात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत आहे. शहरात चोरीचे सत्र सुरू असल्यामुळे व्यवसायिक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आपल्या खाकीचा धाक निर्माण करून शहरातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com