‘ग्रीनफिल्ड’चा भूसंपादन मोबदला जाहीर करा, अन्यथा आत्मदहन

राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांचे खा. डॉ. विखे यांना निवेदन
‘ग्रीनफिल्ड’चा भूसंपादन मोबदला जाहीर करा, अन्यथा आत्मदहन

उंबरे |वार्ताहर| Umbare

सुरत- नगर-हैद्राबाद महामार्ग भूसंपादन प्रक्रियेमध्ये शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन प्रकल्प चर्चा करून मगच मोबदला जाहीर करावा, या मागणीचे निवेदन खासदार डॉ. सुजय विखे यांना महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी समितीने दिले. शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले, जिल्ह्यातून जात असलेल्या महामार्गाच्या भूसंपादनामध्ये शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन शेतकर्‍यांची जमीन संपादित करावी, अशी मागणी प्रकल्पबाधित शेतकरी करीत आहेत. मागण्यांवर विचार झाला नाही तर शेतकरी आत्मदहन करतील, असेही निवेदनातून सूचित करण्यात आले आहे. तसेच जोपर्यंत शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत नोटिफिकेशन-3 प्रसिध्द करू नये. शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी शासन अधिसूचनेमध्ये योग्य ती सुधारणा करण्यात यावी, असे म्हटले आहे.

यावेळी सचिन अकोलकर, गोधराम पागिरे, बाळासाहेब लटके, एकनाथ ढवळे, बाळासाहेब कांबळे, दिलीप अंत्रे, विनोद अत्रे, लक्ष्मण अंत्रे, हरकदास अंत्रे, शामराव अंत्रे, संतोष अंत्रे, भीमराव शिंदे, यादव दिघे आदी उपस्थित होते.

खा. डॉ.सुजय विखे म्हणाले, जोपर्यंत शेतकर्‍यांच्या मागण्यांचा विचार करून मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत नोटीफिकेशन-3 जारी करू नये व त्याबाबतच्या सूचनाही प्रकल्प संचालकांसह महामार्ग अधिकार्‍यांना देण्यात आल्या. शेतकर्‍यांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी कायम शेतकर्‍यांसोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असेल तर प्रकल्प थांबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.