ग्रीन फील्डच्या नगर-अक्कलकोट टप्प्यातील भूसंपादनास मंजुरी

ग्रीन फील्डच्या नगर-अक्कलकोट टप्प्यातील भूसंपादनास मंजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महत्वकांक्षी सुरत-हैद्राबाद ग्रीन फील्डच्या प्रकल्पाच्या अहमदनगर- अक्कलकोट या 235 कि.मी लांबीच्या टप्प्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. या रस्त्याची भूसंपादन प्रक्रीया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

हा महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातील नगर आणि जामखेड तालुक्यातून पुढे बीड, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यात जाणार आहे. नगर आणि जामखेड तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. नगर तालुक्यातील 7 आणि जामखेड तालुक्यातील 13 गावांमधून हा रस्ता जाणार असून, या रस्त्याच्या कामासाठी अंदाजे 280 ते 350 हेक्टर जमिनीचे संपादन होणार असल्याचेही खा. डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर-सोलापूर-अक्कलकोट ग्रीन फील्ड हा मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार असून, वेळेची बचत होणार असल्याने तीनही जिल्ह्यांच्या उद्योग व्यापार क्षेत्रांकरीता मोठी मदत होणार आहे. सुरत, नाशिक, अहमदनगर या 300 कि.मी अंतरातील भूसंपादन प्रक्रीया सुरु झाली असून, थोड्याच दिवसात संपादन होणार्‍या जमिनीची संयुक्त मोजणी सुरु करण्यात येणार आहे. अहमदनगर सोलापूर अक्कलकोट ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे च्या 235 कि.मी लांबीच्या टप्प्यातील भूसंपादनास लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.