गवत पेटल्यामुळे वृक्षारोपण केलेल्या झाडाचे नुकसान

गवत पेटल्यामुळे वृक्षारोपण केलेल्या झाडाचे नुकसान

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा-जळगाव रोडलगत रेल्वेच्या हद्दीत वृक्षारोपण केलेल्या झाडांचे वाळलेले गवत पेटल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

जी झाडे मोठी आहेत त्यांना आगीच्या झळा लागलेल्या आहेत.तर लहान झाडांचे नुकसान झालेले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय श्रमिक रोजगार हमी योजने अंतर्गत 20 एप्रिल 2018 मध्ये पुणतांबा-जळगाव या रस्त्यालगत रेल्वेच्या हद्दीत पश्चिम बाजूला अंदाजे दोन किलोमीटर अंतरापर्यंत वृक्षारोपण करण्यात आले होते. यासाठी 27 लाख 15 हजार रुपयाचा निधी खर्च करण्यात आला होता. या योजनेमुळे अकुशल मजुरांना रोजगारही उपलबध झाला होता.

मात्र एका बाजूने रेल्वेच्या हद्दीत वृक्षारोपण करण्यात आलेले होते. दुसर्‍या बाजूने रस्त्यालगत झाडे लावण्यात आली होती. मध्यंतरी चांगदेवनगर येथे रेल्वे खात्यामार्फत भुयारी पुलाचे काम सुरु असताना ठेकेदाराने रेल्वे लाईनच्या कडेलाच मुरुम टाकल्यामुळे वृक्षारोपण केलेल्या बर्‍याच झाडांचे नुकसान झाले होते. सामाजिक वनीकरण विभाग राहाता यांच्यामार्फत हा उपक्रम राबविण्यात आलेला होता. किती झाडांचे वृक्षारोपण केले होते व सद्य स्थितीत किती झाडे वाढलेली आहेत याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाने जनतेला द्यावी, अशी मागणी परिसरातील पर्यावरणवादी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.