अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी उच्च माध्यमिक शाळांना 20टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आले आहे.

त्यात नगर जिल्ह्यातील अनेक शाळांचा समावेश आहे. या निर्णयामुळे नगर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तरांना दिलासा मिळाला आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

20 टक्के अनुदानासह नगर जिल्ह्यातील पात्र शाळा-शिक्षक, शिक्षकेत्तर पदे कंसात-कर्जतमधील समाज प्रबोधन संस्थेचे समर्थ कला प्रथम, विज्ञान प्रथम (12), राशीनचे हशु आडवाणी कला, वाणिज्य व विज्ञान प्रथम 13), नगरच्या सावेडीतील डॉन बॉस्को विद्यालय वाणिज्य व विज्ञान प्रथम (13), नेवासा तालुक्यातील भेंड्यामधील मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या नेवासा संस्थेचे देवगड येथील गुरूदत्त विद्यालयाच्या कला प्रथम (3), शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील कला प्रथम (3), जनता शिक्षण प्रसारक मंडळ, भातकुडगाव कला प्रथम (4), गोळेगाव संत भगवानबाबा विद्यालय कला प्रथम (4), खानापूर येथील जिजामाता विद्यालय कला प्रथम (3), भेंड्यातील जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान तिसरि, चौथी (10), राजूर संस्थेच्या बारी येथील कळसूबाई उच्च माध्यमिक विद्यालय कला प्रथम(3), राहुरीतील मांजरी येथील चंद्रगिरी विद्यालय कला प्रथम (5), श्रीगोंद्यातील ढवळगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय कला प्रथम (4), मांडवगण येथील सिध्देश्वर विद्यालय विज्ञान प्रथम (9), पारनेरातील देवीभोयरे येथील अंबिका विद्यालय विज्ञान प्रथम (6), नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील सरिता विद्यालय (8), नगर येथील मदर तेरेसा उर्दु ज्युनियर कॉलेज कला प्रथम (3), श्रीगोंदातील लोणी व्यंकनाथ विद्यालय कला प्रथम (3),टाकळीकाझी येथील बन्सीभाऊ म्हस्के विद्यालय विज्ञान प्रथम (8), पाथर्डीतील बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान प्रथम व दुसरी (16), नगरमधील बुर्हाणनगर येथील बाणेश्वर विद्यालय वणिज्य व विज्ञान प्रथम (12), अकोलेतील अगस्ति महाविद्यालय विज्ञान तिसरी, वाणिज्य दुसरी (16), श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महविद्यालय विज्ञान दुसरी व तिसरी (18), नगरच्या माळीवाडायेथील महेंद्र मधुकर वारे विद्यालय वाणिज्य व विज्ञान प्रमथ (9), नेवाशातील शिरसगाव येथील वकिलराव लंघे पाटील विद्यालय (3),पाथडीच्या खरवंडी कासार येथील संत भगवानबाबा विद्यालय कला प्रथम (4), संगमनेरातील मांजी हिल येथील ज्ञानगंगा महाविद्यालय विज्ञान प्रथम (6), कोपरगावातील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय कला व विज्ञान प्रथम (14), पाथर्डीतील श्री तिलोक जैन विद्यालय विज्ञान चौथी व पाचवी (12), शेवगावातील दहिगावेतील नवजीवन विद्यालय 11वी विज्ञान दुसरी (9), पाथर्डीतील आदर्श विद्यालय कला प्रथम (4), यासह जिल्ह्यातील अनेक उच्च विद्यालये आणि महाविद्यालयांचा समावेश आहे.