अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील 1 लाख 63 हजार शेतकर्यांच्या खात्यावर दोन हजारांप्रमाणे 32 कोटी 62 लाखांचा निधी वर्ग झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सहा हप्त्यात पात्र शेतकर्यांच्या खात्यावर 574 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वर्ग झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

आतापर्यंत जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे पाच हप्त वर्ग करण्यात आले आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने या योजनेत 18 हजार कोटींचा निधी देशपातळीवरून वर्ग केला होता.

यात जिल्ह्यातील 1 लाख 63 हजार शेतकरी सहाव्या हप्त्यासाठी पात्र असून त्यांच्या खात्यावर 32 कोटी 62 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेा आहे. तर आतापर्यंत 574 कोटी 45 लाख रुपयांचा निधी पात्र शेतकर्यांना मिळालेला आहे. हा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर 2020 या कालावधीतील आहे.

तालुकानिहाय पात्र शेतकरी

अकोले 14 हजार 745, जामखेड 858, कर्जत 19 हजार 22, कोपरगाव 10 हजार 842, नगर 10 हजार 682, नेवासा 15 हजार 777, पारनेर 15 हजार 936, पाथर्डी 8 हजार 342, राहाता 16 हजार 75, राहुरी 7 हजार 944, संगमनेर 17 हजार 184, शेवगाव 25, श्रीगोंदा 15 हजार 406 आणि श्रीरामपूर 2 हजार 65 एकूण 1 लाख 63 हजार 120 असे आहेत.