पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी द्या; अन्यथा राजीनामा देवू

उंबरी बाळापूरचे उपसरपंच नानासाहेब उंबरकरांचा इशारा
पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी द्या; अन्यथा राजीनामा देवू

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील प्रतिष्ठीत अशा उंबरी बाळापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच नानासाहेब सुखदेव उंबरकर यांनी गावाला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे निधी असूनही विकास कामे करण्यात अडथळे येत असल्याने संगमनेरचे गटविकास अधिकारी यांनी गावासाठी पुर्णवेळ ग्रामविस्तार अधिकारी नेमावा अन्यथा पदाचा राजीनामा देऊन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उंबरी बाळापूर गावाला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे गावातील ग्रामस्थ व नागरीकांची मोठी अडवणूक होत असून शासकीय दाखले, इतर कामासाठी आवश्यक कागदपत्रे व उतारे मिळवण्यासाठी नागरीकांना हेलपाटे मारावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या रोषाचा सामना आम्हा पदाधिकारी यांना करावा लागत आहे.

पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे ग्रामपंचायतीचे अनेक विकास कामे खंडीत असून अनेक प्रस्ताव प्रलंबित आहे. ग्रामपंचायत मध्ये लिपिकाची जागा रिक्त असल्याने पदाधिकारी यांनाच कामे करावी लागत आहे. गावासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असताना पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे विकास कामे खंडीत झाली आहे.

त्यामुळे गावातील विकासकामे करण्याची इच्छा असूनही आम्हाला विकासकामे करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे गावातील नागरीकांच्या विविध समस्या व विकास कामातील अडथळे दूर करण्यासाठी गावासाठी 5 जुलै 2022 पर्यत पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नियुक्त करावा. अन्यथा आपण उपसरपंच पदाचा राजीनामा देऊन पंचायत समितीसमोर आंदोलन करु, असा इशारा निवेदनाद्वारे उपसरपंच नानासाहेब उंबरकर यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com