
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दोन वर्षांपासून प्रलंबित असून त्यासाठी मार्चअखेर गटविकास अधिकार्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. आश्वासित प्रगती योजनेत पात्र ग्रामसेवकांच्या प्रस्तावांचे आदेशही मार्चअखेर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ग्रामसेवक संवर्गाच्या प्रश्नांवर जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होऊन अनेक मागण्यांवर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग वासुदेव सोळंके, निखीलकुमार ओसवाल, ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, अशोक नरसाळे,युवराज पाटील, सुभाष गर्जे, रवींद्र ताजणे, राजेंद्र पावशे, संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दोन वर्षाचे प्रलंबित आहेत.
यासाठी मार्चअखेर तात्काळ गटविकास अधिकारी यांच्याकडून प्रस्ताव बोलावण्यात येतील व त्यानंतर पुढील निर्णायक कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. निलंबित चार ग्रामसेवक जिल्हा परिषद स्तरावर आहेत त्यांना लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्याच्या सूचना दिल्या.