ग्रामसेवक मागण्यांबाबत लवकरच संयुक्त बैठक

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे ग्रामसेवक युनियनला आश्वासन
ग्रामसेवक मागण्यांबाबत लवकरच संयुक्त बैठक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबत लवकरात लवकर बैठक आयोजित करून ग्रामसेवकांच्या प्रश्नांना

न्याय देण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी सकाळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत ग्रामविकासमंत्री तसेच प्रधान सचिवांची एकत्रित बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली. त्याला ना.थोरात यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

ग्रामसेवकांकडून महसूल विभागाचे काम व इतर विभागाचे काम अतिरिक्त आहे. ते तात्काळ कमी करावे, याबाबत पुढाकार घेण्यात यावा तसेच पंचायत विकास अधिकारी पदनिर्मिती, ग्रामसेवकांच्या प्रलंबित प्रवास भत्त्याची फाईल निकाली काढणे, ग्रामसेवक संवर्ग वेतन त्रुटी दूर करणे, शैक्षणिक पात्रता पदवीधर निर्माण होण्यासाठी प्रलंबित असलेली फाईल निकाली काढावी, विमा कवच तात्काळ प्रदान करणे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी जि.प.कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील नागरे, ग्रामसेवक सह. पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पावशे, ग्रामसेवक संघटनेचे उपाध्यक्ष गंगाधर राऊत, सुरेश मंडलिक,विशाल काळे, राहुल वाळके आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com