करोना
करोना
सार्वमत

करोनाने घेतला ग्रामसेवकाचा बळी

उपचार सुरू असतांना प्राणज्योत मावळली

Arvind Arkhade

अहमदनगर |वार्ताहर| Ahmednagar

नगर तालुक्यातील वाळकी ग्रामपंचायत कार्यालयात पाच वर्षांपासून ग्रामविकास अधिकारी पदावर कार्यरत असलेले व हिंगणगावचे रहिवासी बाळासाहेब भास्कर वैराळ (वय 48) यांना करोनाची बाधा झाली होती. उपचार चालू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

ग्रामविकास अधिकारी वैराळ हे अतिशय मन मिळाऊ कार्यतत्पर व मितभाषी होते. गावाची मनापासून सेवा करणारे खरे लोकनायक होते. वाळकी गावातील अनेक विकास कामात अतिशय हिरारीने सहभाग नोंदवून कामाचा ठसा प्रत्येक वाळकीकरांच्या मनात उमटवला. दुष्काळ व करोना संकटात एक योद्धा म्हणून त्यांनी अतिशय जबाबदारीने काम केले.

त्यांचे योगदान कायमच आठवणीत राहील. एक सुजाण अधिकारी या महामारीमध्ये गमावल्याचे दुःख कायमच ग्रामस्थांच्या मनात राहील. गेल्या पंधरा दिवसापासून ते करोना आजाराशी झुंज देत होते. परंतु दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडी, मुलगा, दोन मुली, भाऊ, बहिण असा परिवार आहे. वैराळ यांचा करोनामुळे दुर्दैवी मुत्यु झाल्याने वाळकी, हिंगणगाव, रुईछत्तीशी येथील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com