ग्रामपंचायतींच्या सौर ऊर्जेसाठी 30 लाख रुपयांचा निधी - फटांगरे

ग्रामपंचायतींच्या सौर ऊर्जेसाठी 30 लाख रुपयांचा निधी - फटांगरे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली

तालुक्यातील प्रत्येक वाडी विकासाच्या योजनेत सहभाग घेताना अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने राज्यात प्रथम प्रायोगिक तत्त्वावर व ग्रामपंचायत पिण्याचे पाणी योजनेसाठी सौर ऊर्जेकरिता 30 लाख रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती काँग्रेसचे गटनेते व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती अजय फटांगरे यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना अजय फटांगरे म्हणाले की, संगमनेर तालुका प्रतिकूलतेतून विकासात्मक वाटचाल करत राज्यात मॉडेल ठरला आहे. राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याच्या ग्रामीण विकासावर भर देताना प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्या आहेत.

आपल्या कार्यकाळात अहमदनगर जिल्हा परिषदेने 2019 मध्ये कृषी विभागाच्या वतीने रायातील प्रायोगिक तत्त्वावर ग्रामपंचायतींसाठी सौर ऊर्जेकरिता तीन ग्रामपंचायतींसाठी 30 लाखांचा निधी संगमनेर तालुक्याकरिता दिला आहे. या अंतर्गत कासारे येथे 10 लाख रु.निधीतून 335 वॅट क्षमतेचे 24 सौर पॅनलची उभारणी होणार असून यामधून दररोज 32 युनिट वीजनिर्मीती होणार आहे.

यातून या ग्रामपंचायतीची दरवर्षी सरासरी 90 हजारांची बचत होणार आहे. शेंडेवाडी येथे 7.5 एचपीच्या पंपावर 16 सौर पॅनल व सतिची वाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या पंपावर 5.5 एचपी मोटारसाठी प्रत्येकी 10 लाख रु. निधीतून सौर पॅनल उभारले जाणार आहेत.

तर सारोळे पठार येथील 10 एच.पी.च्या मोटारसाठी 335 वॅट क्षमतेचे 32 सौरपॅनल उभारले गेले असून यातून 40 युनिट वीजनिर्मिती होणार आहे. यामुळे या ग्रामपंचायतींची दरवर्षी 1 लाख रुपयांची वीज बचत होणार आहे. यामुळे ग्रामपंचायतींचा लाईट बिलाचा खर्च वाचणार असून हा एक राज्यात आदर्श व दिशादर्शक प्रकल्प ठरणार आहे.

याकामी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात व जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे व मीराताई शेटे यांचीही मोलाची मदत झाली आहे. या यशस्वी उपक्रमाबद्दल महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर, शंकराव पा. खेमनर, दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, बाबा ओहोळ, रणजितसिंह देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com