सरपंचांना खुशखबर : ग्रामपंचायतींसाठी 60 कोटी 56 लाख रूपयांचा निधी

सरपंचांना खुशखबर : ग्रामपंचायतींसाठी 60 कोटी 56 लाख रूपयांचा निधी

अहमदनगर |बद्रीनारायण वढणे| Ahmednagar

15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या बंधित अनुदानाचा (टाईड) पहिल्या हप्त्यापोटी 1292.10 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे वितरण 80 टक्के ग्रामपंचायत, 10 टक्के पंचायत समिती आणि 10 टक्के जिल्हा परिषद या प्रमाणात तिन्ही स्तरावर करण्यात आले आहे, त्यानुसार नगर जिल्ह्यातील सर्व 1318 ग्रामपंचायतींच्या वाट्याला 60 कोटी 56 लाख 88 हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.

हा निधी अकोलेतील 146, संगमनेर तालुका 143, कोपरगाव 75, राहाता 50, श्रीरामपूर 52, राहुरी 83, नेवासा 114, शेवगाव 94, पाथर्डी 107, जामखेड 58, कर्जत 91, श्रीगोंदा 86, पारनेर 114, अहमदनगर 105 अशा एकूण 1318 ग्रामपंचायतींना मिळणार आहे. यापूर्वी जून 2020 मध्ये सन 2020-21 या कालावधीसाठी नगर जिल्ह्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून 85 कोटी 39 लाख रुपये आले होते. यात 1 हजार 318 ग्रामपंचायतींना 68 कोटी 31 लाख रुपये, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी 8 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मिळाला होता. पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांसाठी हा निधी देण्यात येतो. यामुळे गावांमधील विविध पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते.

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणारा सदर निधी र्झीलश्रळल ऋळपरपलश चरपरसशाशपीं डूीींशा प्रणालीद्वारे वितरित करणे बंधनकारक केले आहे. तसेच सदर निधी थेेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी झठखडेश्रीं-झऋचड या दोन प्रणालीचे इंटिग्रेशन केले आहे. ही रक्कम जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींच्या आयसीआयसीआय बँकेतील खात्यात जमा करण्यात येणार आहे. या अनुदानाचे वाटप ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला बेसिक ग्रँट (अनटाईड) व टाईड ग्रँट अशा दोन प्रकारच्या ग्रॅन्टच्या स्वरूपात 50 - 50 टक्के या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com