ग्रामपंचायतींना 68 कोटी 31 लाखांचा निधी

15 वा वित्त आयोग : जिल्हा परिषद अन् पंचायत समितीला मिळणार प्रत्येकी साडे आठ कोटी
ग्रामपंचायतींना 68 कोटी 31 लाखांचा निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या आठवड्यात राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी 15 व्या वित्त आयोगातून

1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी प्राप्त झाल्याची माहिती ग्रामविकास विभागाकडून देण्यात आली. यात जिल्ह्यातील 1 हजार 318 ग्रामपंचायतींना 68 कोटी 31 लाखांचा निधी मिळणार आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना प्रत्येकी 8 कोटी 53 लाखांच्या निधीचा समावेश राहणार आहे.

गेल्या आठवड्यात 15 व्या वित्त आयोगाच्या दुसरा बंधीत निधीचा 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा हप्ता जिल्हा परिषद पातळीवर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती. जिल्हा परिषद पातळीवर येणार्‍या निधीतून जिल्हा परिषदेच्या वाट्याचा 10 टक्के आणि पंचायत समिती पातळीवर त्यांचा 10 टक्के निधी कपात करून उर्वरित 80 टक्के निधी ग्रामपंचायत पातळीवर वर्ग करण्यात येणार आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आरोगाच्या शिफारशीनुसार वित्तीय वर्ष 2020-21 साठी एकूण 5 हजार 827 कोटी रुपये निधी मंजूर आहे. यापैकी यापूर्वी 4 हजार 370 कोटी 25 लाख रुपये इतका निधी प्राप्त झाला होता, तो जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आलेला आहे.

आता उर्वरित 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपरांचा बंधीत (टाईड) निधी मिळाला असून त्यात जिल्ह्यातील 1 हजार 318 ग्रामपंचायतींना स्वच्छतेशी संबंधित कामे, हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल आणि दुरुस्ती तसेच पेयजल पाणीपुरवठा, पर्जन्यजल संकलन तसेच पाण्याचा पुनर्वापर या संदर्भातील कामे करता येणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com