अशोकनगर व निपाणी वडगाव परिसरातील ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार

अशोकनगर व निपाणी वडगाव परिसरातील ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजलेली अशोकनगर व निपाणी वडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या

15 जानेवारी रोजी होत आहे, या निवडणुकीवर ग्रामस्थ बहिष्कार टाकणार असून काळ्या फिती लाऊन मतदानाच्या दिवशी शांत बसणार आहे.

प्रत्येक निवडणुकीच्यावेळी गावपुढारी विकासाचे पोकळ आश्‍वासन देतात व निवडून आले की काम तर बाजूला राहते परंतु सर्वसामान्य नागरिकांना उद्धट बोलून दमदाटी देऊन गप्प बसवतात. ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या पदाधिकार्‍यांच्या निष्क्रीयतेला कंटाळून आम्ही नागरिकांनी होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

वॉर्डात रस्ते नाही, लाईट नाही, साईड गटार नाही, कचरा कुंडी नाही, कुठलेही विकासाचे काम होत नाही. येणारा निधी त्यांचा मर्जीतील लोकांच्या सांगण्यावरून खर्च केला जातो, सर्वसामान्य मतदार मात्र नागरी सुविधेपासून वंचित राहतो. नागरिकांच्या नागरी सुविधेकडे कोण लक्ष देणार? त्यांना सुविधा कोण देणार? असे अनेक प्रश्‍न आहे. त्यामुळे मतदान न केलेले बरे अशी भावना सर्वसामान्य मतदारांची झाली आहे.

या निवेदनावर शाकीर पठाण, इब्राहीम शेख, नाजनिन शेख, मदिना शेख, जाफर शेख, मुन्ना शेख, शब्बीर पठाण, जमिला पठाण, मोहसीन पठाण, आयाज पठाण, एजाज पठाण, इम्तियाज पठाण, अरिफा पठाण, छोटू शेख, फयाज पठाण, ताराचंद अभंग, बाळू अभंग, संतोष अभंग, लक्ष्मण पाटेकर, सविता पाटेकर यांच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com