आश्वी (वार्ताहर) -

ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र माघारीच्या दिवशी स्पष्ट झाले त्यामुळे संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदारसंघात येत असलेल्या

14 ग्रामपंचायतींच्या 138 जागांसाठी 281 उमेदवार निवडणूक लढविण्यावर शिकामोर्तब झाले. 14 गावातील बहुतांश ठिकाणी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

आश्वी परिसरातील 14 गावांपैकी 3,603 मतदार संख्या असलेल्या कनोली ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 11 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 11 जागांसाठी 22 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 3,582 मतदार संख्या असलेल्या पिप्रीं - लौकी आजमपूर ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 12 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 11 जागांसाठी 22 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 4,689 मतदार संख्या असलेल्या चिंचपूर ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 30 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 13 जागांसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

2562 मतदार संख्या असलेल्या चणेगाव ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 4 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 9 जागांसाठी 20 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 2239 मतदार संख्या असलेल्या झरेकाठी ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 18 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 9 जागांसाठी 19 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 3524 मतदार संख्या असलेल्या पानोडी ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 10 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 11 जागांसाठी 24 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

2139 मतदार संख्या असलेल्या प्रतापपूर ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 31 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 9 जागांसाठी 28 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 2645 मतदार संख्या असलेल्या शेडगाव ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 18 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 9 जागांसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 1605 मतदार संख्या असलेल्या ओझर बुद्रुक ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 8 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 9 जागांसाठी 17 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 932 मतदार संख्या असलेल्या औरंगपूर ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 14 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 7 जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

2901 मतदार संख्या असलेल्या खळी ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 2 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 11 जागांपैकी 5 जागा बिनविरोध झाल्या असून 4 जागांसाठी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

2566 मतदार संख्या असलेल्या दाढ खुर्द ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 10 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 9 जागांसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 3081, मतदार संख्या असलेल्या शिबलापूर ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 21 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 11 जागांसाठी 22 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 3081, मतदार संख्या असलेल्या मनोली ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या 16 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 11 जागांसाठी 22 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शेतकरी व जनसेवा मंडळात ग्रामपंचायतीच्या लढती होणार असल्या तरी परिसरातील प्रतापपूर येथे आ. विखे पाटील यांना मानणार्या कार्यकर्त्यांचे तीन गट पडल्यामुळे त्यांच्यातच सत्तावर्चस्वाची लढाई रंगणार असल्याचे चित्र उभे राहिले आहे. तर इतर गावांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुरंगी लढत होणार आहे. तसेच आश्वी परिसरातील दोन पत्रकारांच्या पत्नी व एक पत्रकार निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.