गुलाल आमचाच…! स्टेट्स झळकले; पण निकालाच्या प्रतिक्षेमुळे घालमेलही वाढली

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

करजगाव | वार्ताहर

काल मतदान संपल्यावर भावी गावकारभाऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. ‘गुलाल आमचाच...’ असे अनेक उमेदवार आणि समर्थकांचे स्टेटस सोशल मिडीयावर झळकले. मात्र, निकालाची घालमेल आणि चिंता उमेद्वाराबरोबर कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आज दिवसभर दिसली.

काल किरकोळ कुरबुरी वगळता शांततेत 86% मतदान झाले. अंमळनेरमध्ये सत्ताधारी गटाच्या भैरवनाथ ग्रामविकास मंडळाकडुन सरपंच पदासाठी अच्युत पंढरीनाथ घावटे व विरोधी श्री गणेश जनसेवा मंडळाचे ज्ञानेश्वर काशिनाथ आयनर यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीकडे मुळाकाठ परिसरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे.

लोकनियुक्त सरपंच पद पाच वर्ष असल्यामुळे पदासाठी टोकाची ईर्षा व संघर्ष असे काही चित्र या निमित्ताने पहावयास मिळाले. आपल्याच गटाचा सरपंच व सदस्य निवडून आणण्यासाठी स्थानिक नेत्यांनी चांगलीच कंबर कसली होती. अंमळनेरमध्ये कुणाला लॉटरी लागणार हे सर्व उद्या मतमोजणी निकला नंतर स्पष्ट होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com