
अहमदनगर (प्रतिनिधी) -
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडून आणण्यासाठी पक्षाने
रणनीती आखली आहे. यासाठी पक्षाने काही पदाधिकार्यांना जिल्ह्यांच्या जबाबदार्या दिल्या आहेत. त्यात माजीमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे नगर जिल्ह्याची तर जामखेडचे माजीमंत्री राम शिंदे यांच्याकडे नाशिक तर पंकजा मुंडे यांच्याकडे बीडची जबाबदारी देण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींसह राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार तयारी केली आहे. नगर जिल्हा साखर सम्राटांचा. या जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्वर आहे. त्यामुळे या जिल्ह्याची जबाबदारी भाजपाचे तारणहार गिरीष महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे.
प्रा. राम शिंदे हे जामखेडचे. युती सरकारच्या काळात त्यांनी मंत्रीपद आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविलेले आहे. पण त्यांच्याकडे नगर ऐवजी नाशिकची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना नेहमीप्रमाणे बीडचीच जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक आणि जबाबदारी
सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर आणि वर्धा
पंकजा मुंडे- बीड
चंद्रशेखर बावनकुळे- नागपूर आणि भंडारा
गिरीष महाजन- जळगाव आणि अहमदनगर
आशिष शेलार - ठाणे
रवींद्र चव्हाण - सिंधुदुर्ग
रावसाहेब दानवे पाटील - नांदेड
संजय कुटे- अकोला आणि अमरावती
सुरेश हाळवणकर - सांगली आणि पुणे
सुभाष देशमुख - कोल्हापूर
प्रसाद लाड - रत्नागिरी उत्तर-दक्षिण
प्रवीण दरेकर- रायगड उत्तर-दक्षिण
विनोद तावडे - पालघर
गिरीष बापट - सातारा
संजयबाळा भेगडे- सोलापूर
संभाजी पाटील निलंगेकर- लातूर आणि उस्मानाबाद
प्रीतम मुंडे - परभणी
बबनराव लोणीकर - हिंगोली
डॉ.भागवत कराड - जालना
जयकुमार रावल- धुळे
प्रा.देवयानी फरांदे-नंदुरबार
प्रा.राम शिंदे - नाशिक
चैनसुख संचेती - यवतमाळ
रणजीत पाटील - वाशिम
डॉ.अनिल बोंडे - बुलढाणा
अनिल सोले- गोंदिया
हरिभाऊ बागडे -औरंगाबाद
डॉ.रामदास आंबटकर - गडचिरोली