एकरूखे (वार्ताहर) -

राहाता तालुक्यातील रांजणगाव खु. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 3 पॅनल उभे राहिले असल्यामुळे मोठी चुरस

निर्माण झाली आहे. हे तीन ही गट आ. राधाकृष्ण विखे पा. यांना मानणारे असून हे तीन ही गटात गणेशचे दोन आजी-माजी संचालक व एक युवा नेतृत्व तयार झाल्यामुळे या निवडणुकीकडे गणेश परिसराचे लक्ष लागले आहे.

यातील जनसेवा पॅनलचे नेतृत्व गणेशचे संचालक नितीन गाढवे व अनिल गाढवे हे करत आहे. जनसेवा श्री मच्छिंद्रनाथ मंडळाचे नेतृत्व सोपानराव कासार व शामराव गाढवे, राजेंद्र गाढवे व राजेंद्र ज्ञानदेव गाढवे हे करत आहे तर तिसरा पॅनल श्री मच्छिंद्रनाथ जनसेवा मंडळाचे नेतृत्व गणेशचे माजी संचालक दिलीपराव गाढवे व शिवाजी नाना गाढवे हे करत आहे.

वार्ड नं. 1- सर्वसाधारण- आप्पासाहेब गाढवे, बाबासाहेब गाढवे, रविंद्र गाढवे. ना. मा. प्रवर्ग महिला- माधुरी गाढवे, विमल गाढवे, सिंधू गाढवे.

वार्ड नं. 2- अनुसूचित जाती- गीतानंद लोंढे, रवींद्र लोंढे, बाबासाहेब लोंढे. ना. मा. प्रवर्ग व्यक्ती- दिपक अनारसे, उमेश कासार, सोपान कासार. सर्वसाधारण महिला- उज्वला कासार, नीलिमा गाढवे, सारिका गाढवे.

वार्ड नं. 3- सर्वसाधारण- संतोष गाढवे, शाम परदेशी, पांडुरंग मासाळ. अनुसूचित जाती महिला शांता तेलोरे, लताबाई लोंढे व लता लोंढे. ना. मा. प्रवर्ग महिला- सुनीता कासार, प्रतिभा गाढवे, सुवर्ण गाढवे.

वार्ड नं. 4- ना. मा. प्रवर्ग व्यक्ती- गोरख कर्पे, दत्तात्रय कासार, सुमीत गाढवे. सर्वसाधारण महिला- प्राची कासार, लीला कासार, कल्पना कोरडे, छाया खरात, संगीता गाढवे, अर्चना जंंजाळ.

वार्ड नं. 5- सर्वसाधारण व्यक्ती- कैलास गाढवे, नितीन गाढवे, किरण बोर्डे व सर्वसाधारण महिला अलका घोगळ, सुनीता बोर्डे असे असे तिनही गटाचे उमेदवार आहेत.