हनुमंतगाव (वार्ताहर) -

राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे जनसेवा मंडळ

आणि महाविकास आघाडी प्रणित प्रवरा शेतकरी मंडळ यांच्यात चुरशीची लढत होत आहे.

जनसेवा मंडळाच्या मंडळाचे वॉर्ड निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. वार्ड क्रमांक 1- उमेश गीताराम घोलप, संगीता चंद्रकांत कदम, शेख शाहिना अरिफ. वार्ड क्रमांक 2- पिंपळे राजेंद्र हिरामण, घोलप सागर सुरेश, घोलप सुप्रिया संदीप. वार्ड क्रमांक 3- प्रवीण बाबासाहेब घोलप, प्रतिभा पोपट घोलप. वार्ड क्रमांक 4- विजय बबन कदम, रोहिणी गोविंद कदम ,परीगा किशोर कडू याप्रमाणे उमेदवार निवडणूक लढवत आहे.

प्रवरा शेतकरी मंडळाचे वॉर्डनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. वार्ड क्रमांक 1- अमोल प्रकाश कडू, गोरे सरिता मच्छिंद्र, घोलप शारदा प्रकाश. वार्ड क्रमांक 2- संतोष विजय पिंपळे, सागर पंडित कडू, पुष्पा रावसाहेब कडू. वार्ड क्रमांक 3- दत्तात्रय रमेश कडू, रुपाली सुधाकर कडू. वार्ड क्रमांक 4- सतीश सुधाकर कदम, स्वीटी अविनाश कदम, जयश्री सुर्यभान शिंदे हे निवडणूक लढवत आहे. आ. राधाकृष्ण विखे तसेच खा. डॉक्टर सुजय विखे यांच्या जनसेवा मंडळात दोन गटात होणारी निवडणूक यावर्षी शेतकरी मंडळाने सहभाग घेतल्याने वेगळीच चुरस निर्माण करणार आहे. महाविकास आघाडी प्रणित प्रवरा शेतकरी मंडळाने या निवडणुकीत भाग घेतल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. जनसेवा मंडळाचे दोन गट एकत्रित किती प्रभावाने काम करतात यावर निवडणुकीचे भविष्य अवलंबून आहे, असे जाणकारांचे मत आहे.