खरवंडी (वार्ताहर) -

नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव ग्रामपंचायतीच्या 9 जागांपैकी एक जागा बिनविरोध निवडून आली असून उर्वरीत

8 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत.

निपानीनिमगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. एक मधील सत्ताधारी प्रगती जनसेवा पॅनलच्या उमेदवार पुजा वैजनाथ जाधव या बिनविरोध निवडून आल्या. उर्वरित 8 जागेसाठी मतदान घेण्यात येणार आहे.

प्रगती जनसेवा पॅनेलचे उमेदवार- प्रभाग 1- बाळासाहेब भिमरा कनगरे, लताबाई दादासाहेब काकडे, ज्योती दत्तात्रय पवार. प्रभाग 2 मधून आवेश एकनाथ चव्हाण, रामेश्वर बाबासाहेब येवले. प्रभाग 3- कांताबाई तुकाराम आदमने, गंगुबाई एकनाथ चव्हाण व मयुर कैलास पवार.

ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार -प्रभाग 1- अर्जुन सखाहरी कांबळे, आरती दिपक आदमने, मुक्ताबाई श्रीराम भणगे. प्रभाग 2- दिपक भाऊसाहेब आदमने, दिपक पोपट काकडे. प्रभाग 3- प्राची सचिन कांबळे, कविता प्रकाश आदमने व बाळु राधाकिसन पवार (अपक्ष) असे दोन्ही पॅनेल चे 15 उमेदवार व एक अपक्ष आपले नशिब अजमवात आहेत.