देवगाव (वार्ताहर) -

नेवासा तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. 13 जागांसाठी तीन अपक्षांसह

29 जण रिंगणात आहेत.

मागील पंचवार्षिक पासून ग्रामपंचायत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या ताब्यात होती. नामदार शंकरराव गडाख प्राणित श्रीराम ग्रामविकास पॅनल व माजी आमदार मुरकुटे यांचा स्व. मारूतराव घुले पा. श्रीराम ग्रामविकास पॅनल यांच्यात लढत होत आहे. त्याचबरोबर तीनही वार्ड मध्ये तीन अपक्ष आपले नशीब अजमावत आहेत.

एकूण 3527 मतदार असून प्रत्येक उमेदवार आपल्या पध्दतीनें मतदारांशी संपर्क करीत आहे. गावातील चौकाचौकात डिजीटल बोर्ड ुदसय आहीय. जास्तीत जास्त जागा जिंकवून आपल्या गटाचा झेंडा फडकावून आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटाकडील नेत्यामध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. या निवडणुकीत नव मतदारांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. जसा - जसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे तशी निवडणुक प्रचारात रंगत वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.