ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनी 19 जानेवारीपूर्वी खर्चाचा अहवाल द्यावा

तहसीलदार प्रशांत पाटील
तहसीलदार प्रशांत पाटील

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नुकत्याच पार पडलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमधील अर्जदार व उमेदवार यांनी 19 जानेवारीपूर्वी खर्चाचा तपशील आमच्याकडे सादर करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

तालुक्यातील खंडाळा, उंबरगाव, वांगी खुर्द, वांगी बुद्रुक, माळेवाडी, कमालपूर अशा एकूण 6 ग्रामपंचापयतीसाठी ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीची (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूक दि. 18 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आली असून दि. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी झाली आहे.

त्या अनुषंगाने 28 नोव्हेंबर 2022 ते दि. 20 डिसेंबर 2022 पर्यंत निवडणुकीकामी अर्जदार यांच्याकडून नामनिर्देशन पत्रे भरुन घेणे कामी राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाप्रमाणे सदर कालावधीत नामनिर्देशनपत्र भरलेले आहेत, असे सर्व अर्जदार (वैध, अवैध, माघार घेतलेले, बिनविरोध, निवडणूक लढविलेले) यांचेकडून निवडणूककामी झालेला दैनंदिन खर्चाचा अहवाल प्राप्त करुन घेण्यात यावा. सदर खर्चाचा अहवाल सादर करण्यास राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी झालेपासून ते 19 जानेवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

दैनंदिन निवडणूक खर्च व सर्व आवश्यक अहवालाच्या माध्यमातून ऑनलाईल पध्दतीने सादर करुन त्याची प्रिंटआऊट काढून व त्यावर उमेदवार, अर्जदाराने स्वाक्षरी करुन नमूद केलेल्या विहीत मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com