12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत लढत

12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत लढत

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव तालुक्यात पार पडणार्‍या 12 गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपमध्ये रंगतदार सामना रंगण्याची चिन्हे आहेत. यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर सध्या राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या गटाचे वर्चस्व आहे. तसेच या गावच्या सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची व अटीतटीची ठरण्याची चिन्हे आहेत.

तालुक्यातील तालुक्यातील जोहरापूर, खामगाव, प्रभूवाडगाव, भायगाव, रावतळे कुरुडगाव, रांजणी, दहीगाव ने, वाघोली, आखेगाव, अमरापूर, सुलतानपूर खुर्द, खानापूर, या 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जनतेतून थेट सरपंच पदासह निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यातील 12 पैकी 10 ग्रामपंचायतींवर महिलांची सरपंचपदी जनतेतून वर्णी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत अनेक ग्रामपंचायतींवर महिलाराज अवतरणार आहे.

राज्यात सत्तांतर होऊन नव्याने उदयास आलेली राजकीय समीकरणे लक्षात घेता. भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी व भाजपात तूल्यबळ लढतीचे संकेत असले तरी शिवसेना उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे प्रणीत शिवसेना, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, जनशक्ती आघाडी, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व विविध राजकीय पक्षांची भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या 27 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार असल्याने या गावातून निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून ऐन थंडीच्या कडाक्यात या गावांचे राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

ग्रामपंचायतीचा कारभार बहुतेक ठिकाणी पुरुष मंडळी हाताळताना दिसतात. परंतु या निवडणुकीत 12 पैकी 10 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित असून सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने गावची धुरा सांभाळणार्‍या गावकारभार्‍यांना आता आपल्या पत्नीला, मुलीला व सुनेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे लागणार आहे. मात्र आपल्या मंडळाच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची जमवाजमव ते मतदान संपेपर्यंतची सर्व प्रक्रिया गावकारभार्‍यांना सांभाळण्याची वेळ आली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

अशा 12 गावच्या निवडणुकीसाठी येत्या 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, 5 डिसेंबरला छाननी, 7 डिसेंबरला माघार व चिन्ह वाटप, त्यानंतर 18 डिसेंबरला मतदार होऊन दि.20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com