सोशल मीडियामुळे बाभळेश्वर ग्रामपंचायत प्रचारात रंगत वाढली

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

बाभळेश्वर (वार्ताहर) -

राहाता तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या बाभळेश्वर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय

उमेदवारांनी प्रचारात करोनाचे सर्व नियम पाळून आघाडी घेतली असून प्रत्येक उमेदवार हा घरोघरी जाऊन प्रचार करीत आहे. त्याचबरोबर उमेदवार नमस्कार, पाया पडताना, हस्तांदोलन करताना दिसत आहेत. लाउडस्पीकर लावलेल्या गाड्या प्रचार करताना सर्व गावात दिसत आहेत. हे सर्व करताना मात्र उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. उमेदवार अतिउत्साही दिसत असला तरी त्या मानाने मतदार तितकासा उत्साही दिसत नाही. तरी पण उमेदवार हे आपली हवा करण्यात दंग आहेत. त्यामुळे प्रचारात चांगलाच रंग भरला आहे.

बाभळेश्वर ग्रामपंचायतीत आ. राधाकृष्ण विखे प्रण़ित जनसेवा मंडळ विरुद्ध रावसाहेब म्हस्के व शिवसेना प्रणित महाविकास आघाडी यांच्यात लढत होत आहे. त्याचबरोबर दोन अपक्ष आपले नशीब आजमावत आहेत. बाभळेश्वर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 6 प्रभाग अस्तित्वात असून एकूण 5454 मतदार आहेत. यात पुरूष मतदाराची संख्या 2914 तर स्त्री 2540 मतदारांची संख़्या आहे.

प्रभाग क्र. 1 मध्ये 446 मतदार आहेत. यात पुरूष मतदारांची संख्या 229 तर स्त्री मतदारांची संख्या 217 आहे. प्रभाग क्र. 2 मध्ये 1305 मतदार आहेत. यात पुरूष 685 मतदारांची संख़्या आहे तर स्त्री मतदारांची 620 संख़्या आहे. प्रभाग क्र. 3 मध्ये मतदार 906 आहेत. यात पुरूष 481 तर स्त्री मतदारांची संख़्या 425 आहे. प्रभाग क्र. 4 मध्ये 998 मतदार आहेत. यात पुरूष 534 तर स्त्री मतदारांची संख़्या 464 आहे. प्रभाग क्र 5 मध्ये 818 मतदार आहेत. यात पुरूष 445 तर स्त्री मतदारांची संख़्या 373 आहे. प्रभाग क्र. 6 मध्ये मतदार 981 आहे. यात पुरूष मतदारांची संख्या 540 आहे. तर स्त्री मतदारांची संख़्या 441 आहे. एकंदरित या सर्व मतदारांशी संपर्क उमेदवार करीत आहेत. शेती, वाड्या वस्तीवर उमेदवार गाठीभेटी घेऊन आश्वासने देत आहेत. गावात प्रत्येक प्रभागात प्रचार फेर्‍या काढल्या जात आहेत. शेताच्या बांधावर उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत.

या प्रचारात महिला मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे. गावपातळीवर डिजिटल बोर्ड नियम पाळून लावले जात आहे. बर्‍याच वेळा प्रचार करताना एकमेकांच्या विरोधात असणार्‍या उमेदवारांच्या समोरासमोर अनपेक्षित गाठी होताना दिसत आहे. बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव मांडली जात आहे. मागील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे दहा वर्षांनंतर ग्रामपंचायतीची निवडणूक होत असल्यामुळे आ. राधाकृष्ण विखे प्रण़ित जनसेवा मंडळाला व रावसाहेब म्हस्के व शिवसेना प्रणित महाविकास आघाडीला गडाबरोबर सिंह निवडून आणावा लागणार आहे. याचे कारण म्हणजे सरपंचपदाच्यानिवडणुकीनंतर सोडत असल्यामुळे पद हे कोणत्या प्रवर्गासाठी मिळेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे गड व सिंह या दोघांना महत्त्व आहे. बाभळेश्वर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जनसेवा मंडळ व महाविकास आघाडीने म्हस्के, बेंद्रे ,बनसोडे, गोंडे, कांदळकर या समान आडनावाचे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे भाऊबंदकीत व सगेसोयर्‍यांत लढत रंगणार आहे. त्यामुळे गावपुढार्‍यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचारात रंगत वाढली असली तरी सिंकदर कोण होणार? हा येणारा काळच ठरवणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com