
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीसह 82 ठिकाणी पोट निवडणुकीसाठी पुढील महिन्यांत 5 नोव्हेंबर मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शुक्रवार (दि.20) शेवटचा दिवस आहे. गुरूवारी रात्री उशीरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे सदस्य पदासाठी 2 हजार 342, सरपंचपदासाठी 426 आणि पोटनिवडणुकीसाठी 29 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची जमा झाली होती.
मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी 16 ते 20 ऑक्टोबर मुदत आहे. ही मुदत आज संपणार असून दाखल नामनिर्देशनपत्रांची छानणी 23 ऑक्टोबर होणार आहे. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. यानंतर 5 नोव्हेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून मतमोजणी 6 नोव्हेंबर मतमोजणी होवून निकाल घोषित होणार आहे.
गुरूवारी रात्री जिल्हा प्रशासनाकडे सदस्य पदासाठी 2 हजार 342, सरपंचपदासाठी 426 आणि पोटनिवडणुकीसाठी 29 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची जमा झाली होती. आज शेवट दिवस असून अर्ज दाखल करण्यासाठी तांत्रिक अडचण येत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी दिलेली 3 वाजपर्यंतची मुदत सायंकाळी 5.30 वाढवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने देण्यात आली.