ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पाथर्डी तालुका प्रशासन सज्ज

41 केंद्रांवर ईव्हीएम द्वारे होणार मतदान
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पाथर्डी तालुका प्रशासन सज्ज

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज असून मतदान केंद्रावर उमेदवार कोणताही अनुचीत प्रकार न घडण्याची कळाजी घेतली जाणार आहे. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी तथा पाथर्डीचे तहसीलदार शाम वाडकर यांनी दिली आहे.

पाथर्डी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडत असून त्यासाठी 18 डिसेंबर रोजी रविवारी सकाळी साडे सात ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मतदान केले जाणार आहे. निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन सेट केले असून त्या सील करून पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी तालुका प्रशासन सज्ज झाले असून 41 मतदान केंद्रावर मतदान केले जाणार आहे.

17 डिसेंबर रोजी सर्व मतदान केंद्रावरती अधिकारी कर्मचारी व मतदान यंत्र बसद्वारे पोहोच केले जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरची व्यवस्था करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी नेमलेले असून अन्य कर्मचारी असे एकूण 228 मदतीला असणार आहे. तीन झोनल अधिकारी तसेच नाही तहसीलदार भानुदास गुंजाळ,मुरलीधर बागुल,अनिल तोरडमल, संजय माळी यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी निवडणुकीचे कामकाज पाहत आहेत.

तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदाच्या अकरा जागांसाठी 33 उमेदवार तर ग्रामपंचायत सदस्यांच्या एकशे नऊ जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित शंभर जागांसाठी 240 उमेदवार उभे ठाकले आहे. मोहरी, वडगाव, सोनोशी, कोळसांगवी, निवडुंगे, भालगाव, वैजूबाभूळगाव, कोरडगाव, कोल्हार, तिसगाव, जिरेवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणूकासाठी मतदान होणार आहे.

20 डिसेंबरला मतमोजणी

सर्व 11 ग्रामपंचायतींच्या मतदानाची मतमोजणी 20 डिसेंबर रोजी पाथर्डी तहसील कार्यालयात पार पडणार असून नऊ टेबल च्या प्रक्रिया पूर्ण होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असल्याचे तहसिलदार वाडकर यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com