कुकाणा (वार्ताहर) -

नेवासा तालुक्यातील कुकाणा ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी जनसेवा व ग्रामविकास मंडळात सरळ लढत

होत आहे दोन्ही मंडळाच्या 30 उमेदवारांसह अन्य सहा अपक्षही रिंगणात आहेत.

पाच प्रभागांतून एकूण पंधरा सदस्य निवडून देण्यासाठी दोन मंडळाव्यतिरीक्त सहा अपक्षांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत एकूण 36 उमेदवार नशीब आजमावत आहेत.

जनसेवा मंडळाचे उमेदवार- प्रभाग 1- बाळासाहेब देवराव उंडे (नामा प्रवर्ग). भाऊसाहेब किसन फोलाणे (सर्वसाधारण), विजया बापूसाहेब खराडे (सर्वसाधारण स्त्री) प्रभाग 2- मच्छिंद्र रामभाऊ कावरे (सर्वसाधारण), मोहिनी संजय वाघ (नामा प्रवर्ग स्त्री), सुनीता भारत गरड (सर्वसाधारण स्त्री). प्रभाग 3.- श्रीधर नारायण कासार (नामा प्रवर्ग व्यक्ती) इकबाल बालम इनामदार (सर्वसाधारण) सुजाता विलास देशमुख (सर्वसाधारण स्त्री) प्रभाग 4- दौलतराव चंद्रकुमार देशमुख (सर्वसाधारण), छाया कारभारी गोर्डे (अनु.जाती स्त्री), शिवगंगा उमाकांत सदावर्ते (ना.मा.प्रवर्ग स्त्री), प्रभाग- 5- संदीप अशोक चाबुकस्वार (अनु.जाती व्यक्ती) मंगल शरद कचरे (सर्वसाधारण स्त्री), नंदा उत्तम देवढे (सर्वसाधारण स्त्री).

ग्रामविकास मंडळाचे उमेदवार- प्रभाग 1- मच्छिंद्र गोरख जाधव (ना.मा.प्रवर्ग), राजेंद्र कडूबाळ म्हस्के (सर्वसाधारण), आशाबाई रामदास खराडे (सर्वसाधारण स्त्री), प्रभाग 2- एकनाथ गोपीनाथ कावरे (सर्वसाधारण), लताबाई विठ्ठलराव (ना.मा.प्रवर्ग स्त्री), हकिमाबी लालाभाई शेख (सर्वसाधारण स्त्री), प्रभाग 3- सुजित अशोक मंडलिक (ना.मा.प्रवर्ग), अपुर्वा अनिल गर्जे (सर्वसाधारण), संगीता सुभाष चौधरी (सर्वसाधारण स्त्री), प्रभाग-4- सुरेश बाबासाहेब पाटील (सर्वसाधारण), सुनीता नितीन गोर्डे (अनु.जाती स्त्री), नलिनी निलेश देशमुख (ना.मा.प्रवर्ग स्त्री), प्रभाग 5- सुनील गुलाब गोर्डे (अनु.जाती व्यक्ती), शुभांगी सोमनाथ कचरे (सर्वसाधारण स्त्री), अनुराधा गणेश निकम (सर्वसाधारण स्त्री).

या दोन मंडळांव्यतिरीक्त सहा उमेदवार अपक्ष आहेत. ते पुढीलप्रमाणे - प्रभाग 2 मधून युनूस इब्राहिम शेख (सर्वसाधारण व्यक्ती), प्रभाग 3 मधून रज्जाक निजामशाह इनामदार (ना.मा.प्रवर्ग व्यक्ती), प्रशांत उत्तमराव बागडे (ना.मा.प्रवर्ग व्यक्ती) व रितेश विजयकुमार भंडारी (सर्वसाधारण) प्रभाग 4 मध्ये मनीषा देवेंद्र नरवणे (ना.मा.प्रवर्ग स्त्री) तर प्रभाग 5 मधून शमशाद अब्दुलरहिम शेख (सर्वसाधारण स्त्री) हे सहा उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.

एकूण 15 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी दोन मंडळ एकमेकांच्याविरोधात दंड ठोकून उभे राहिले असून सहा अपक्ष उमेदवार मिळून 36 जण रिंगणात उतरले आहेत. एकंदरित निवडणूक रंगतदार होणार आहे.