ग्रामपंचायत पोटनिवडणूक : संगमनेर 74.63 व अकोले 67.02 टक्के मतदान

ग्रामपंचायत पोटनिवडणूक  : संगमनेर 74.63 व अकोले 67.02 टक्के मतदान

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर उपविभागातील संगमनेर तालुक्यातील 5 ग्रामपंचायत जागांसाठी 74.63 टक्के मतदान पार पडले. तर अकोले तालुक्यातील 4 ग्रामपंचायत जागांसाठी 67.02 टक्के मतदान पार पडले. सर्वत्र मतदानासाठी उत्साह दिसून आला. अत्यंत सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.

संगमनेर उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांंच्या मार्गदर्शनाखाली कालच्या पोटनिवडणुकांसाठी प्रशासनाने तयारी केली होती. संगमनेर तहसीलदार अमोल निकम व अकोले तहसीलदार सतीश थेटे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडली. संगमनेर तालुक्यात 35 निवडणूक कर्मचार्‍यांची यासाठी नेमणूक करण्यात आली होती. तर 5 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. अकोले तालुक्यात यासाठी 4 मतदान पथके, प्रत्येक पथकात 6 कर्मचारी व याशिवाय 2 राखीव पथके नियुक्त करण्यात आली होती. ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात आले.

संगमनेरमधील समनापूर, कुरकुटवाडी, ओझर खुर्द आश्वी बु.,वडगांवलांडगा या 5 ग्रामपंचायत जागांसाठी 5 मतदान केंद्रांवर काल सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरूवात झाली. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान पार पडले. पुरूष 1237 व स्त्रीया 1201 असे 2438 मतदारांनी मतदान केले. एकूण 74.63 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 81.85 टक्के मतदान समनापूर ग्रामपंचायतीत झाले.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 19 जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. बोरबन, म्हसवंडी, व मिरपूर या 3 ग्रामपंचायतींमधील 5 जागांसाठी एकही अर्ज प्राप्त नाही. तर खराडी, चिंचपूर, मिर्झापूर, पळसखेडे, काकडवाडी, निमगांवटेंभी, कोंची मांची, निमगावजाळी या 8 ग्रामपंचायतींच्या 8 जागा बिनविरोध करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com