अण्णा हजारे
अण्णा हजारे
सार्वमत

ग्रामपंचायत प्रशासकाच्या मुद्यावरुन अण्णा आक्रमक

पालकमंत्र्यांच्या उलेखावरुन मुख्यमंत्र्यांना पत्र

Arvind Arkhade

सुपा|वार्ताहर|Supa

राज्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला अथवा शिफारस घ्यावी या मुद्यावरुन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभुषण अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत, काल अण्णांनी कायदाचा किस काढत घटनेत कुठे पालकमंत्र्यांचा उल्लेख आहे हे जनतेला दाखवा म्हणत अण्णांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहिले आहे.

याबाबत अण्णा हजारे यानी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, महाराष्ट्र राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1566 ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची मुदत जुन -जुलै मध्ये संपत आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शासन राजपत्र असाधारण भाग चार 24 जून 2020 निवेदन सादर केले आहे.

त्यामध्ये राज्यपालांनी पालकमंत्र्यांचा कुठेही उल्लेख केलेला नाही. तसेच घटनेतील 1959 च्या कलम 151 च्या पोटकलम 1 मध्ये खंड (क )मध्ये ही कुठेही पालकमंत्र्यांचा उल्लेख आलेला नाही. पण ग्रांमविकास विभागाने 14 जुलै 2020 रोजी एक परिपत्रक काढुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने नेमायचा आहे असे म्हटले आहे.

पालकमंत्री आपल्या पक्ष पार्टीच्या व्यक्तीचे नाव सुचविणार आणि राज्यात लोकशाही पायदळी तुडवली जाणार आहे.घटनेत कुठेही पालकमंत्र्यांचा उल्लेख नसताना ग्रामविकास विभागाने काढलेले पत्रक राज्यातील जनतेची दिशाभुल करणारे असून बेकायदेशीर आहे. स्वतः चा पक्ष मजबूत करण्यासाठी हे आहे का असा सवालही त्यांनी केला आहे.

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा. तसेच ग्रामविकास विभागाने घटनेची आणि कायद्याची पायमल्ली करून घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली आहे, असेही अण्णांनी या पत्रात म्हटलं आहे. हा निर्णय घेणार्‍या मंत्र्यांचा गृहपाठ कच्चा राहिला आहे. त्यामुळे त्यांना कायदा, घटना यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला आहे.

ग्रामविकास मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्र पाठविले आहे. त्यात हा निर्णय का घ्यावा लागला याचा उहापोह केला आहे. तसेच आपली भेट घेणार असून याबाबत माहिती देईल असे नमूद करून भविष्यात मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवली आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत नगर जिल्ह्यातील तब्बल 722 ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्‍या तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांनी फिल्डींग लावली आहे. त्या त्या पक्षांकडून याद्याही तयार करण्याचे काम सुरू आहे. पण हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाल्याने नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com